30 ऑक्टोबर : अभिनेता कमल हसन यांनी काही वेळापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची दादरमधल्या कृष्णकुंज निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेटली.
कमल हसन आणि राज ठाकरे यांच्या भेटीचं कारण कळू शकलेलं नाही. मराठी सिनेसृष्टीतील कलाकार नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी राज ठाकरे यांची भेट घेत असतात. मात्र, दाक्षिणात्य सिनेमातील मोजकेच कलाकार राज यांची भेट घेतात. सुपरस्टार कमल हसनने राज ठाकरेंची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, राज हे माझे जुने मित्र आहेत. आज मुंबईत आलो होतो. त्यामुळे राज यांची भेट घेण्यासाठी आलो. ही सदिच्छा भेट असल्याची माहिती कमल हसन यांनी दिली.
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv |