राहुल गांधींनी वाटेला जाऊ नये- उद्धव ठाकरे

3 फेब्रुवारीराहुल गांधींनी मराठी माणसाच्या वाटेला जाऊ नये, असा इशारा शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी दिलाय. मराठी माणसाने नेहरुंनाही बंद गाडीतून फिरायला भाग पाडले होते. त्यामुळे महाराष्ट्र फोडण्याचे षडयंत्र कुणी रचत असल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल असेही उद्धव म्हणालेत. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेने अभिनेता शाहरुख खानने पाक क्रिकेटपटूंविषयीच्या वक्तव्याबाबत माफी मागावी, असा आग्रह धरला आहे. तसेच 26/11च्या हल्ल्यात मुंबईकरांना वाचवणारे बिहार आणि युपीचे कमांडो होते, असं वक्तव्य राहुल गांधींनी केले आहे. त्यावरही सेनेने टीकेची झोड उठवलीय. या घटनांबाबत शिवसेनेची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी उद्धव यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. काँग्रेसच्या बुजुर्गांनी राहुल यांची समजूत घालावी, असे आवाहन करतानाच त्यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली. दिल्लीने डोळे वटारल्याने चव्हाणांनी लागलीच टॅक्सीच्या परमीटचा मार्ग बदलला. त्यांची मला लाज वाटते असेही उद्धव म्हणाले. विदर्भाबाबत भाजपची काहीही भूमिका असली तरी आम्ही महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी 'भारतात खेळायला द्या' अशी परवानगी मागायला जावेद मियाँदाद मातोश्रीवर आला होता. पण शिवसेनाप्रमुखांनी त्याला परवानगी नाकारली. याशिवाय मुंबई हल्ल्यातले शहीद हेमंत करकरे यांच्यावर सेनेने साध्वी प्रकरणावरुन टीका केली होती, असा खुलासाही त्यांनी यानिमित्ताने केला.

  • Share this:

First published: February 3, 2010, 12:28 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading