Elec-widget

पिंपरी-चिंचवडमध्ये गुंडांचा उच्छाद, 25 गाड्यांची केली तोडफोड

पिंपरी-चिंचवडमध्ये गुंडांचा उच्छाद, 25 गाड्यांची केली तोडफोड

  • Share this:

pimpari gunda28 ऑक्टोबर : पिंपरी-चिंचवडमध्ये मंगळवारी रात्री काही गुंडांनी गाड्यांची तुफान तोडफोड केल्याचा प्रकार घडलाय. शहरातल्या चिखली शाहुनगर परिसरात हा प्रकार घडला. यात तब्बल 25 गाड्यांचं नुकसान झालंय. त्यांना थाबवायला आलेल्या नागिरक आणि पोलिसांनावरही या गुंडांच्या टोळीने हल्ला केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय.

सु-नियोजित शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या पिंपरी चिंचवड शहरात कायद्याचे अक्षरशः कायद्याचे तीन तेरा वाजले आहेत. शहरातील वाढत्या गुन्हेगारांच्या टोळ्या स्वतःच वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सामान्य नागरिकांना वेठीस धरत असल्याचे प्रकार ,इथे रोजच घड़तायत. मंगळवारी रात्रीही शहरातील चिखली शाहुनगर परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या 10 ते 12 तरुणांच्या टोळ्क्याने अक्षरशः हैदोस घातला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनावर बेफाम दगडफेक करत या गुंडांनी अनेक गाड्यांची तोडफोड केली. या घटनेत एकूण 25 पेक्षा अधिक गाडयांचं मोठ नुकसान झालं आहे. गुंडांनी गाड्यांसह परिसरातील अनेक दुकानांही टार्गेट केलं. रात्री

घडलेला प्रकार आणि या गुन्हेगारांचा नंगा-नाच सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झालाय. धक्कादायक बाब म्हणजे प्रतिकार करण्यासाठी गेलेल्या नागरिक आणि पोलिसांवर ही हल्ला करण्यापर्यंतची या गुंडांची मजल गेलीय. शहरात मागच्या 15 दिवसातील ही तीसरी घटना आहे, वारंवार होणार्‍या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशतीच वातावरण पसरलंय तर पिंपरी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर ही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 28, 2015 08:36 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...