मुंबई महापालिकेचे 20 हजार कोटींचे महाबजेट

3 फेब्रुवारीमुंबई महापालिकेचे 20 हजार 417 कोटींचे महाबजेट जाहीर झाले आहे. महापालिकेचे आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी शिलकीचे बजेट सादर केले आहे. या बजेटमध्ये शिक्षणासाठी 1 हजार 792 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पाणीपुरवठा आणि मलनि:सारणासाठी 3 हजार 371.52 कोटी तर आरोग्यासाठी 418.06 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शिक्षणासाठी वेगळे बजेट सादर करण्यात आले आहे. महापालिका शाळांमध्ये साबण, टॉवेल असावेत यासाठी प्राथमिक शाळांकरिता 74.51 कोटींची तर माध्यमिक शाळांसाठी 10.37 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महापालिका शाळांमध्ये सुगंधी दूध योजनेकरिता 118 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 2009-10 च्या तुलनेत शैक्षणिक बजेटमध्ये यावर्षी 192.65 कोटींची जादा तरतूद करण्यात आली आहे.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 3, 2010 10:23 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading