चंद्रकांत पाटलांना पालकमंत्रिपदावरून हटवा - नीलम गोर्‍हे

Sachin Salve | Updated On: Oct 27, 2015 04:05 PM IST

चंद्रकांत पाटलांना पालकमंत्रिपदावरून हटवा - नीलम गोर्‍हे

27 ऑक्टोबर : कोल्हापूर महानगर पालिकेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपमध्ये चांगलाच सामना रंगलाय. राज्य आणि केंद्र सरकारमध्ये एकत्र असलेले सेना आणि भाजप ही निवडणूक मात्र स्वतंत्र लढतायत. त्यामुळे एकमेकांवर होणार्‍या आरोप-प्रत्यारोपांना ऊत आलाय. सेनेच्या प्रवकत्या नीलम गोर्‍हेंनी आज एक मागणी केली आणि यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजलीय. कोल्हापूरची निवडणूक होईपर्यंत चंद्रकांत पाटलांना पालकमंत्री पदावरुन हटवा, अशी मागणी नीलम गोर्‍हे यांनी केली आहे.

कोल्हापूर पालिका निवडणुकीत पक्षांमध्ये टोळी युद्ध चालू आहे. शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे

कोल्हापूरचे पालकमंत्री चंदकांत पाटील यांची नैतीक जबाबदारी आहे की नाही ?, पालकमंत्र्यांनी उत्तरदायित्व घेतले पाहिजे. निवडणुकीपर्यंत दुसरे पालकमंत्री नेमले पाहिजे अशी मागणी नीलम गोर्‍हे यांनी केलीये. याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तशी मागणी करणार असल्याचंही नीलम गोर्‍हे यांनी सांगितलं. निवडणुकीत पैसे वाटपाच्या कारणावरून काल राष्ट्रवादी आणि भाजप-ताराराणी आघाडीच्या कार्यकार्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती. एवढंच नाहीतर हे प्रकरण एकमेकांची कार्यालय फोडण्यावर गेली. त्यामुळे नीलम गोर्‍हे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक होईपर्यंत चंद्रकांत पाटलांना हटवण्याची मागणी केली. विशेष म्हणजे, अलीकडे शिवसेना आणि भाजपमध्ये शीतयुद्ध सुरूच आहे. दसर्‍या मेळाव्यातही शिवसेनेनं भाजपवर जाहीर टीका केली होती. आता स्थानिक पातळीवर नेते आमनेसामने आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 27, 2015 03:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close