सूरज परमार आत्महत्येप्रकरणी लवकरच दाखल होणार आरोपपत्र

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 27, 2015 02:07 PM IST

suraj parmar_buldier27 ऑक्टोबर : ठाण्यात बिल्डर सुरज परमार यांनी आत्महत्या केल्यानंतर ठाण्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. परमार यांच्या सुसाईड नोटमध्ये नगरसेवक आणि पालिका अधिकार्‍यांची नावं आहेत.पोलिसांनी देखील या प्रकरणात आरोपपत्र तयार करण्यास सुरुवात केली आहे. परमार आत्महत्येप्रकरणी पुरावे गोळा करण्याच काम सुरू असून या प्रकरणी 306 म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे अश्या प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे महापालिकेच योग्य प्रकारे ऑडिट व्हावं आणि कारवाई व्हावी अशी मागणी ठाण्यातील काँग्रेसचे गट नेते संजय घाडीगावकर यांनी केला आहे.

ठाण्यातील बिल्डर सुरज परमार यांनी 7 ऑक्टोबर रोजी आत्महत्या केल्यानंतर ठाणे पोलिसांनी घोडबंदर रोडवरील परमार यांच्या साइडवर असणार्‍या चारचाकी गाडीतून सुसाईड नोट हस्तगत केल्यानंतर फॉरेन्सिक लॅबमध्ये सदरची नोट पाठविण्यात आली होती. या प्रकरणात काही नावेसमोर आली आहेत. या करीत 4 टीम्स पोलिसांनी तयार केल्या आहेत. तसंच या प्रकरणात टीम्स वाढविण्यात येणार असल्याचं ठाणे पोलिसांनी सांगितलं आहे तर ठाणे पोलिसांनी परमार कुटुंबियांना पोलीस संरक्षण दिले आहे. भविष्यात देखील त्यांना अधिक पोलीस संरक्षण देण्यात येईल असे देखील ठाणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तर पालिकेतील अधिकार्‍यांवर अधिक दबाव येत असल्यामुळे पालिकेतील अधिकार्‍यांनी राजीनामा दिला असल्याचं देखील घाडीगावकर यांनी सांगितलं आहे. तसंच परमार प्रकरणात पोलिसांवर कुठल्याही प्रकारचा राजकीय दबाव नसल्याच देखिल ठाणे पोलिसांनी सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 27, 2015 02:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...