पाकिस्तानात भूकंपाच्या तडाख्यात 260 मृत्युमुखी

पाकिस्तानात भूकंपाच्या तडाख्यात 260 मृत्युमुखी

  • Share this:

pakistan earth

27 ऑक्टोबर : सोमवारी विनाशकारी भूकंपाने उत्तर भारतासह पाकिस्तान, अफगाणिस्तान हादरला. या भूकंपामुळे पाकिस्तानात सर्वात जास्त नुकसान झालंय. पाकमध्ये भूकंपानं आतापर्यंत260 बळी घेतलेत, तर 1300 जण जखमी झालेत. पाकिस्तानात 7.5 तीव्रतेचा भूकंपाचे धक्के बसले. गेल्या 10 वर्षांमधला हा सर्वात जास्त तीव्रतेचा भूकंप आहे. पंजाब प्रांत तसंच पाकव्याप्त काश्मीरमध्येही याचे धक्के बसले. यामुळे अनेक इमारती हादरल्या, तसंच काही ठिकाणी जमीन खचली. अनेक ठिकाणी नागरिक इमारतींमधून बाहेर पडले होते. अनेक ठिकाणी नागरिक प्रार्थनाही करत होते.

 अफगाणिस्तानातील हिंदुकुश पर्वतरागांमध्ये केंद्रबिंदू असलेल्या या शक्तिशाली भूकंपामुळे पाकिस्तानमध्ये मोठी जीवितहानी झाली आहे. . या भूकंपात भारतातील 3 जणांचा तर अफगाणिस्तानात 12 विद्यार्थिनींसह 24 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.

उत्तर भारतातील दिल्ली, श्रीनगर, हिमाचलप्रदेश, राजस्थान, पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्ये तर पाकिस्तानातील लाहोर, इस्लामाबादसह अनेक भागांत दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. सुमारे दोन मिनिटं हे हादरे जाणवत होते.

भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं असून अनेक भागातील इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. भारतात भूकंपाची तीव्रता 7.7 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे, तर पाकिस्तानात भूकंपाची तीव्रता 8.01 रिश्टर स्केल होती. भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानातील हिंदुकुश पर्वतरागांमध्ये होता. त्यामुळे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये या भूकंपामुळे मोठं नुकसान झाल्याचं समजतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 27, 2015 07:22 AM IST

ताज्या बातम्या