लाज गेली, मालिकाही गेली ; द.आफ्रिकेविरुद्ध भारताचा लाजिरवाणा पराभव

लाज गेली, मालिकाही गेली ; द.आफ्रिकेविरुद्ध भारताचा लाजिरवाणा पराभव

  • Share this:

ind vs sat33326 ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपल्याच मायभूमीत भारताला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. मुंबई वनडेमध्ये भारताचा तब्बल 214 रन्सनं धुव्वा उडवलाय. मुंबई वनडे जिंकून दक्षिण आफ्रिकेनं भारताविरुद्धची सीरिज 3-2 अशी जिंकली आहे. दक्षिण आफ्रिकेनं पहिल्यांदाच भारताविरोधात सीरिज जिंकली आहे.

पहिल्यांदा बॅटिंग करताना दक्षिण आफ्रिकेनं भारताच्या बोलर्सची अक्षरशः धुलाई केली. एबी डिव्हिलीयर्सच्या सेंच्युरीजच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं 438 रन्सचा डोंगर उभा केला आणि भारताला हे लक्ष्य गाठता आलं नाही. वानखेडे स्टेडियमचा इतिहास पाहता भारताला हा डोंगर पार करणं कठीणच जाणार होतं. शिखर धवन, आणि अजिंक्य रहाणे यांनी लाज राखण्याचा प्रयत्न केला. पण मॅच जिंकण्यासाठी भारताला जोरदार सुरुवात मिळण्याची गरज होती.

मात्र तसं करण्यात ओपनर अपयशी ठरले. रोहित शर्मा 16 तर तिसर्‍या क्रमांकावरचा विराट कोहली फक्त 7 रन्स काढून माघारी फिरले, तेव्हाच भारताचं भवितव्य काय ते स्पष्ट झालं होतं. या सीरिजमध्ये भारताने दोन मॅच जिंकून कशीबशी बरोबरी साधली होती. पण, अतिंम सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: October 26, 2015, 8:08 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading