नशेसाठी विकलं पोटच्या मुलीला...

नशेसाठी विकलं पोटच्या मुलीला...

2 फेब्रुवारीकेवळ व्यसनासाठी बापानं आपल्या मुलीला अवघ्या बाराशे रुपयांना विकल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडलीय. राजा माने असं या नशेबाज बापाचं नाव आहे. त्याची मुलगी प्रिया ही कागल तालुक्यातल्या सिद्धनेर्ली गावाजवळच्या एका वीटभट्टीवर काम करत होती. नशेच्या आहारी गेलेल्या या बापानं आशा आणि रमेश माने या जोडप्याकडून बाराशे रुपये घेऊन मुलीला त्यांच्या हवाली केलं. शिकण्याची इच्छा असलेल्या प्रियाला घरातील लहान मुलं सांभाळण्यासाठी आणलंय, असं माने कुटुंबानं म्हटलंय. या गंभीर घटनेची दखल बाल हक्क अभियानाने घेतली. आणि त्यांनी कागल पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार दाखल केलीय.

  • Share this:

Tags:
First Published: Feb 2, 2010 12:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading