हार्बर लाईनवर उद्या सहा तासांचा मेगाब्लॉक !

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 24, 2015 01:40 PM IST

333mumbai_local_24 ऑक्टोबर : हार्बर लाईनवर उद्या सहा तासांचा मेगाब्लॉक असणार आहे. वडाळा इथं ओव्हरक्रॉसिंगची जागा बदलण्याचं काम आणि आणखी काही तांत्रिक कामांसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मस्जिद ते चुनाभट्टी आणि वडाळा रोड ते माहीम दरम्यान हा ब्लॉक सकाळी 11 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत घेतला जाईल. हार्बरवरील मेगाब्लॉक दरम्यान सीएसटी ते वाशी, बेलापूर आणि पनवेल दरम्यान लोकल फेर्‍या रद्द केल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे सीएसटी ते वांद्रे, अंधेरी दरम्यानच्याही लोकल सेवा रद्द केल्या जातील. अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष लोकल फेर्‍या सोडण्यात येतील. कुर्ला येथून आठ नंबरवरून लोकल सुटतील, असे सांगण्यात आले. ब्लॉक काळात हार्बर मार्गावरील प्रवाशांना मेन लाइन तसंच पश्चिम रेल्वेवरून त्याच तिकिटावर प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. या ब्लॉकबरोबरच मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरही मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप (सीएसटीच्या दिशेने) धीम्या मार्गावर सकाळी सव्वाअकरा ते दुपारी सव्वातीन वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे या मार्गादरम्यान अप धीम्या मार्गावरील लोकल अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. अप धीम्या मार्गावर नाहूर, कांजूरमार्ग आणि विद्याविहार स्थानकात लोकल थांबणार नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2015 01:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...