...जर पटत नसेल तर बाजूला व्हा -राज ठाकरे

  • Share this:

full_speech_raj23 ऑक्टोबर : तुम्ही विचारांचं सोनं लुटा, हे महापालिका लुटत आहेत. मुळात आघाडी सरकारमध्ये आणि युती सरकारमध्ये फरक नाही. जर पटत नसेल तर भाजप-शिवसेनेनं वेगळं व्हावं अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेचं नाव न घेता केली. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीश्वरांपुढे झुकले आहे असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला. डोंबिवलीत झालेल्या सभेत राज ठाकरेंनी चौफेर तोफ डागली.

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीला आता आठवडा उरलाय. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डोंबिवलीत सभा घेऊन प्रचाराचा धुराळ उडवला. यावेळी त्यांनी भाजप-शिवसेनेवर सडकून टीका केली. गेल्या 20 वर्षांमध्ये शिवसेना आणि भाजपने या शहरांची वाट लावून ठेवलीये. या पुढील सभांमध्ये ही लोकं काय बोलतात हे पाहण्यासारखंच आहे. शहरांची अवस्था बकाल करून ठेवलीये. आणि ही लोकं विचारचं सोनं लुटायला बोलवतात आणि दुसरीकडे ही महापालिका लुटताय अशी टीका राज यांनी केली.

'मुुख्यमंत्री दिल्लीश्वरांसमोर वाकणारे'

यावेळी राज ठाकरे यांनी मनसे 10 हजार कोटी देणार अशी घोषणा केली खरी पण आमच्याकडेच पैसे नाही तर मुख्यमंत्री कुठून देणार ? असा प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्र्यांवर शरसंधान साधलं. राज्य सरकारकडे पैसे नाहीत. आणि मुख्यमंत्री साडेसहाशे कोटींचं पॅकेज जाहीर करताय. मग मुंबई पालिका, औरंगाबाद, नाशिक, पुण्याला किती देणार ?, मुळात राज्य सरकारकडे पैसाच नाही तेव्हा अशा घोषणा करताच कशाला ?, पॅकेजच्या या घोषणा निव्वळ फार्स आहे अशी परखड टीका राज यांनी केली. अलीकडे मुख्यमंत्री जपान दौर्‍यावर गेले होते. तिथे आदराने एकमेकांसमोर वाकून स्वागत केलं जातं अशी तिकडे प्रथा आहे. पण आपल्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीश्वरांसमोर वाकण्याची सवयच झाली आहे अशी खिल्लीही राज यांनी उडवली.

'कुठे आहे अच्छे दिन'

100 दिवसांत अच्छे दिन येणार असं आश्वासन या भाजप सरकारने दिलं होतं पण आता 500 दिवस झाले कुठे आहे अच्छे दिन ?, कुठे महागाई दूर झाली. एकीकडे दुष्काळ जाहीर करायचा आणि दुसरीकडे डान्सबार सुरू करायचे हेच का ते अच्छे दिन ? असा सवाल राज यांनी उपस्थित केला.

'जैनांची भाजपसोबत सेटिंग'

समाजात जातीचं विष कालवलं जातंय. बाहेरून आलेली परप्रांतीय पुन्हा एकदा डोकंवर काढत आहे. जैन समाजही भाजपसोबत साटंलोटं करत आहे. आपल्याला 40 जागा मिळाव्यात यासाठी भाजपसोबत सेटिंग लावत आहे असा आरोपही राज यांनी केला. या शहरांचा विकास करायचा असेल तर पूर्ण सत्ता हातात द्या जर विकास करू शकलो नाहीतर पुढची निवडणूक लढणार नाही असं आवाहनही राज यांनी दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 23, 2015 09:28 PM IST

ताज्या बातम्या