सिंचन घोटाळ्यासाठी स्थापन केल्या 308 बोगस कंपन्या - किरीट सोमैया

सिंचन घोटाळ्यासाठी स्थापन केल्या 308 बोगस कंपन्या - किरीट सोमैया

  • Share this:

Kirit somaiya in pawar and tatkare

23 ऑक्टोबर : सिंचन घोटाळ्याप्रकरणी एकीकडे अजित पवार आणि सुनील तटकरे यांची एसीबीकडून चौकशी सुरू आहे. तर दुसरीकडे भाजप खासदार किरीट सोमैया यांनी याप्रकरणी त्यांच्यावर अत्यंत धक्कादायक आरोप केला आहे. अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी तब्बल 308 बोगस कंपन्या स्थापन केल्या, असा खळबळजनक दावा भाजप खासदार किरीट सोमैया यांनी केला आहे. अर्थखात्याचे सचिव आणि रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर यांना पत्राद्वारे किरीट सोमैया यांना पत्र पाठवून अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

तसंच कोंडाणे धरणातील भ्रष्टाचारासाठी एफए कन्स्ट्रक्शनने नेत्यांना लाच देण्यासाठी युनियन बँकेतून 800 कोटी रुपये काढले. हे 800 कोटी पचवण्यासाठी कोट्यवधीची बोगस बिलं सादर करण्यात आल्याचा आरोपही किरीट सोमैया यांनी पत्रात केला आहे. शिवाय कोंडाणे धरणाची किंमत ही वारंवार वाढवल्याचा दावाही सोमैयांनी केला आहे.

दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून तटकरे आणि पवार यांची एसीबीच्या कार्यालयात चौकशी करण्यात आली. त्यामुळे आता किरीट सोमैयांच्या पत्रांमुळे दोघांची अडचण आणखीच वाढली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: October 23, 2015, 12:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading