भारताने लुटलं विजयाचं 'सोनं', द.आफ्रिकेचा 35 रन्सने केला पराभव

भारताने लुटलं विजयाचं 'सोनं', द.आफ्रिकेचा 35 रन्सने केला पराभव

  • Share this:

ind vs sout22 ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 'करो या मरो' सामन्यात अखेर भारताने विजय मिळवत दसर्‍याचं 'सोनं' लुटलंय. विराट कोहलीच्या शानदार शतकाच्या बळावर भारताने चौथ्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिके चा 35 रन्सने पराभव केला. या विजयासह भारताने पाच मॅचच्या या सीरीजमध्ये 2-2 ने बरोबरी साधलीये. 300 रन्सचा पाठलाग करणारी दक्षिण आफ्रिकेनं टीम 264 रन्सवर गारद झाली.

चेन्नईतील एम. चिदंबरम स्टेडियमवर चौथ्या वन डेमध्ये भारताने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला.भारतानं, 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्सवर 299 रन्स केले. विराट कोहलीनं 138 रन्सतची दमदार खेळी केली. विराटचं हे 23वंं शतक आहे. तर सुरेश रैनानं हाफ सेंच्युरी करत विरोटला चांगली साथ दिली. तर अजिंक्य रहाणेनंही 45 रन्सची खेळी केली.

टॉस जिंकुन मैदानात उतरलेल्या भारताची सुरुवात मात्र चांगली झाली नाही. 50 रन्समध्येच सलामी आलेल्या दोन्ही बॅटसमनला रोखण्यात द.आफ्रिकेला यश आलं. त्यानंतर कोहली आणि रहाणेने टीम इंडियाची कमान सांभाळली. तिसर्‍या विकेटसाठी दोघांमध्ये 100 रन्सची पार्टनशीप झाली. रहाणे 45 रन्स करून आऊट झाला. त्यानंतर विराटने पुन्हा एकदा दमदार बॅटिंग करत शानदार शतक झळकावले. कोहलीने 113 बॉल्सचा सामना करत चार चौकार आणि 3 सिक्स लगावत शतक पूर्ण केलं. कोहलीसोबत सुरेश रैनानेही अर्धशतकी खेळी करून टीम इंडियाचा स्कोअर उभारला. रैना 53 रन्स करून आऊट झाला. त्यानंतर विराट 138 रन्सवर आऊट झाला.

भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 300 रन्सचं टार्गेट ठेवलं. 300 रन्सचं पाठलाग करणार्‍या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. 100 रन्सच्या आत चार बॅटसमॅन तंबूत परतले होते. तर दुसरीकडे कॅप्टन अब्राहम डिविलियर्सने एकाकी झुंज देत शतक ठोकले. पण, भुवनेश्वर कुमारने डिवालियर्सची विकेट घेऊन भारताच्या विजयाची वाट मोकळी करून दिली. त्यानंतर एकापाठोपाठ आफ्रिकेनं टीमने शरणागती पत्कारली. अखेर भारताने विजयादशमीच्या दिनी सोनं लुटतं सामन्यात बरोबरी साधलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: October 22, 2015, 11:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading