देशात नवी उमेद निर्माण झालीये - मोहन भागवत

देशात नवी उमेद निर्माण झालीये - मोहन भागवत

  • Share this:

¿Ö¦ü¯ÖÖê»Ö ¾Ö¯ÖÖêãîÖêæ123

22 ऑक्टोबर :दोन वर्षापूर्वी देशात निराशेचे वातावरण होतं. मात्र, आता देशात नवी उमेद निर्माण झालीये, असं म्हणत सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदींच्या कामाचं कौतुक केलं आहे. तसेच जन-धन योजना, गॅस सबसिडी, स्वच्छता अभियान यासारख्या योजनेचंही भागवत यांनी कौतुक केलं. मोदींच्या कार्याचे कौतुक करतानाच भागवत यांनी व्होट बँकेच्या राजकारणापलीकडे विचार करणं गरजेच असून देशातील सर्व नागरिकांसाठी लोकसंख्येबाबत समान धोरण असलं पाहिजे, असा सल्लाही त्यांनी सरकारला दिला आहे.

विजयादशमीनिमित्त नागपूरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदी सरकारचं तोंड भरुन कौतुक केलं. तर विरोधकांवर मात्र चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रय मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते. दोघांनीही संघाच्या गणवेशात कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. भारतातील विविध प्रांतातील स्वयंसेवक पथसंचलनासाठी नागपुरात दाखल झाले आहेत. पथसंचलनानंतर शस्त्रपुजनाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण झाले.

यावेळी बोलचाना, सर्वांगिण विकासासाठी केवळ सरकारवर अवलंबून राहता येणार नाही. सरकारमुळेच देशाची प्रगती होते असे नाही जनतेनेही सहभाग द्यायला हवा आणि परंपरेने मिळालेली अर्थव्यवस्था सुधारण्यास वेळ लागणारच, असे खडेबोल भागवत यांनी विरोधकांना सुनावले आहेत. देशामध्ये शिक्षणाचं व्यापारीकरण झालं ही सर्वात भयंकर गोष्ट आहे. मागच्या काही वर्षात या मध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे शिक्षण पद्धतीत बदल करणं फार गरजेचं आहे, असं म्हणत भागवत यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं.

वाढत्या लोकसंख्येनुसार उत्पादन वाढवावे लागेल. कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी लोकभावना बनवावी लागेल. तसंच देशातील निवडणूक व्यवस्थेत बदल करणं गरजेचं असल्याचं भागवत यांनी सांगितलं आहे. निवडणूक व्यवस्था हे भ्रष्टाचाराचे कुरण बनायला नको. लोकप्रतिनिधी खर्‍या अर्थाने लोकांसाठी निवडून येतील अशी व्यवस्था असायला हवी, असंही ते पुढे म्हणाले. देशाच्या विकासाचं सूत्र भारताच्या संस्कृतितच आहेत. पण काही घटनांमुळे त्यावर गदा आल्याचं बोललं जातं असल्याचं सांगत अशा छोट्या मोठ्या घटनांमुळे आपली संस्कृती बिघडत नाही, असंही त्यांनी म्हटलं.

Loading...

त्याशिवाय, सीमारेषेवर पाकिस्तानची शत्रूबुद्धी आणि चीनच्या विस्तारबुद्धीचा सामना करावा लागत आहे. इसिसचाही धोका आहे तर, देशांतर्गत दहशतवादाचेही संकट आहे. अशावेळी शांती, सुरक्षा, सुशासन ठेवण्यात सरकारची भूमिका खूप महत्त्वाची असल्याचे भागवत यावेळी म्हणाले. त्याचबरोबर, केवळ भौतिक विकास महत्त्वाचा नाही तर अध्यात्मिक विकासही महत्त्वाचा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 22, 2015 11:05 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...