नागपूरात संघाच्या विजयादशमी उत्सवाला सुरूवात

नागपूरात संघाच्या विजयादशमी उत्सवाला सुरूवात

  • Share this:

Fadnavis112

22 ऑक्टोबर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आज (गुरुवारी) विजयादशमीचा कार्यक्रम मुख्यालयात सुरू आहे. त्यानिमित्त जोरदार तयारी करण्यात आली आहे. भारतातील वेगवेगळ्या प्रांतातील स्वयंसेवक पथसंचलनासाठी नागपुरात दाखल झाले आहेत. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत स्वयंसेवकांना संबोधित करणार आहेत.

विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वयंसेवकाच्या गणवेशात उपस्थित आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विजयादशमीच्या कार्यक्रमाला संघाच्या गणवेशात उपस्थित राहण्याची ही पहिलाच वेळ आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही प्रमुख पाहुणे म्हणून हजर आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाची संघाने जोरदार तयारी केली असल्याचे दिसून येत आहे.

यावर्षी पहिल्यांदाच सरसंघचालक मोहन भागवत यांचं भाषण वेबसाईटवर लाईव्ह असणार आहे. मागील काही दिवसात देशातील सहिष्णू वातावरणावरुन राष्ट्रपतींनी सरकारला सुनावलं. याशिवाय साहित्यिकांनाही पुरस्कार परत केले. राज्यात शिवसेना-भाजपचं पटत नाही. या पार्श्वभूमीवर सरसंघचालक काय भाष्य करणार याकडे सर्वाचं लक्ष्य लागलं आहे. विजयादशमी उत्सवासाठी सध्या नागपूरमध्ये जोरदार तयारी सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: October 22, 2015, 7:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading