कल्याण- शीळ रोडवर बंदुकीच्या धाकावर 56 लाखांची लूट

कल्याण- शीळ रोडवर बंदुकीच्या धाकावर 56 लाखांची लूट

  • Share this:

CMS WAN

21 ऑक्टोबर : कल्याण-शीळ रोडवर निळजे रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यावर 56 लाखांची रोकड लुटल्याची घटना मंगळवारी घडली. एका टोळक्याने बंदुकाचा धाक दाखवून सीएमएस कंपनीच्या कॅश व्हॅनमधली रक्कम लांबवली.

सीएमएस या कंपनीची कॅश व्हॅन निळजे रेल्वे स्टेशनजवळ उभी होती. दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या दरोडेखोरांनी व्हॅनमधल्या कर्मचार्‍यांना शस्त्रांचा धाक दाखवून 56 लाखांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे.

लूट करण्यासाठी वापरलेली स्कॉर्पिओ व्हॅन दिवा रेल्वे स्टेशनजवळ सोडून दिलेली आढळली असून चोरांनी रोकड घेऊन पोबारा केला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 21, 2015 08:24 AM IST

ताज्या बातम्या