News18 Lokmat

'प्रियांकाच माझी वारसदार, इंदिरा गांधींनी व्यक्त केली होती इच्छा ?

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 20, 2015 09:31 PM IST

'प्रियांकाच माझी वारसदार, इंदिरा गांधींनी व्यक्त केली होती इच्छा ?

20 ऑक्टोबर : प्रियांका गांधी याच आपल्या राजकीय वारसदार असतील, असं इंदिरा गांधी यांना वाट होतं असा गौप्यस्फोट त्यांचे जवळचे सहकारी एम.एल.फोतेदार यांनी केलाय.

इंदिरा गांधी यांचे निष्ठावंत सहकारी फोतेदार यांचं 'चिनार लिव्ह्‌ज' हे पुस्तक 30 ऑक्टोबर रोजी प्रकाशित होणार आहे. या आगामी पुस्तकात फोतेदार यांनी इंदिरा गांधी यांच्या आठवणींना उजाळा दिलाय. काश्मीरच्या भेटीवर असताना इंदिरा गांधी यांनी प्रियांकाबद्दलचं मत आपल्याजवळ व्यक्त केल्याचं फोतेदार यांनी म्हटलंय. त्यानंतर अनेक वर्षांनी म्हणजे राजीव गांधी यांच्या हत्येनंतर फोतेदार यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं होतं. आणि इंदिरा गांधी यांनी प्रियंका यांच्याबद्दल काय वाटत होतं, ते सांगितलं होतं. पण त्यामुळे सोनिया गांधी रागावल्या, असा दावा फोतेदार यांनी केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 20, 2015 06:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...