क्रिकेटचा वाघ वीरेंद्र सेहवाग अखेर क्रिकेटमधून निवृत्त

क्रिकेटचा वाघ वीरेंद्र सेहवाग अखेर क्रिकेटमधून निवृत्त

  • Share this:

virender sehwag retirement20 ऑक्टोबर : ज्याच्या तडाखेबाज फलंदाजीने भल्याभल्या बॉलर्सला घाम फुटायचा...चौकार आणि षटकाराच्या आतषबाजीने मैदान उजाळून निघायचे...त्याच्या विक्रमाची बरोबर अजूनही भल्याभल्यांना जमली नाही...असा हा क्रिकेटचा 'वाघ' अखेर निवृत्त झालाय. वीरेंद्र सेहवागने अखेर आपण सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलंय. काल सोमवारी दुबईत सेहवागने आपण निवृत्त होत असल्याचे संकेत दिले होते. आणि आज त्याने निवृत्तीची घोषणा केलीये. सेहवाग आता आयपीएलमध्येही खेळणार नाही.

क्रिकेटच्या मैदानावर सेहवाग म्हटल्यावर भल्याभल्या बॉलर्सला घाम फुटायचा असा दरारा सेहवागचा होता. 1999 मध्ये सेहवागने पाकिस्तान विरुद्धच्या वन डे सामन्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. पण, पहिल्याच सामन्यात सेहवाग 1 रनवर आऊट झाला. त्यामुळे काही दिवस तो मैदानाबाहेरच होता. पण, त्यानंतर 2000 मध्ये झिम्ब्बाबे विरुद्ध सेहवागला पुन्हा टीममध्ये संधी मिळाली. 2001 मध्ये श्रीलंका आणि न्युझीलंड ट्राय सीरिजमध्ये सेहवागने आपल्या कारकिर्दीतले अर्धशतक झळकावले. याच सीरीजमध्ये सेहवागने अवघ्या 69 चेंडूमध्ये शानदार शतक झळकावत आपली दखल घेण्यास अवघ्या जगाला भाग पाडले. त्यानंतर त्याने कधी मागे वळून पाहिले नाही.

सेहवागने एक-एक पायरी चढत विक्रामाचा शिखर सर केला. 'वीरू', 'नजफगड के नवाब', 'आधुनिक क्रिकेटचा जेन मास्टर' अशी ओळख सेहवागला मिळाली. बॅटिंगसोबतच सेहवागने फिरकी गोलंदाजाची भूमिकाही पार पाडली. 2009 मध्ये सेहवाग हा एकमेव असा भारतीय खेळाडू ठरला ज्याने 'विजडन लिडिंग क्रिकेटर ऑफ द इयर' चा खिताब मिळवला. सलग दुसर्‍या वर्षीही त्याने या पुरस्कारवर आपले नाव कोरले.

कसोटी सामन्यामध्ये एकाच सामन्यात त्रिशतक करण्याचा विक्रम सेहवागच्या नावावर आहे. सेहवागने आतापर्यंत 228 एकदिवशीय सामन्यात 13 शतक आणि 36 अर्धशतक झळकावत 7,380 रन्स केले. एकदिवशीय सामन्यात सर्वाधिक 219 रन्सचा विक्रमही सेहवागने रचला. जो आजपर्यंत कुणीही मोडू शकला नाही. एकदिवशीय सामन्यात आक्रमकपणे खेळणार सेहवाग कसोटी सामन्यातही याच ताकदीने उतरला. 72 कसोटी सामन्यात त्याने 17 शतक आणि 19 अर्धशतक झळकावत 6,248 धावा ठोकल्या आहेत. एकदिवशीय सामन्या सर्वात जलद शतक ठोकण्याचा भारतीय खेळाडूचा विक्रम सेहवागाच्या नावावर जमा आहे.

मार्च 2010 मध्ये न्युझीलंडच्या विरुद्ध सेहवागने अवघ्या 60 चेंडूत शतक ठोकले होते. एवढंच नाहीतर सेहवागने चांगली पाटर्नशीपही निभावली. 'द वॉल' राहुल द्रविडसोबत त्याने 410 धावांचा विक्रम रचलाय. सर डोनाल्ड ब्रॅडमॅन आणि ब्रायन लाराच्यानंतर सेहवाग हा जगातला एकमेव असा खेळाडू आहे ज्याने दोन वेळा तीन शतक झळकावले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही क्रिकेटरकडून सर्वाधिक जलद त्रिशतक (319 धावा) बनवण्याचा विक्रम सेहवागच्या नावावर आहे. सेहवागने 278 चेंडूमध्ये 319 धावा ठोकल्या होत्या.

मात्र, ज्या क्रमाने वीरूने एक एक पायरी चढली त्या उलट सेहवाग मागेही पडला. महेंद्र धोणीसोबत वाद, दुखापत आणि खराब फॉर्ममुळे सेहवाग बॅकफूटवर पडला. एकदिवशी, कसोटी सामन्यात कित्येक महिन्यात सेहवाग टीममध्ये आपले स्थान मिळवू शकला नाही. 2015 च्या वर्ल्डकपमधूनही सेहवागला बाहेर बसावं लागलं होतं. सर्वात धक्कादायक म्हणजे सेहवागला अ श्रेणीतूनही वगळण्यात आलं होतं. त्यानंतर सेहवाग आयपीएलमध्ये खेळतोय. पण, भारतीय टीममध्ये तो आपले स्थान मिळवण्यात अपयशी ठरला. ऐककाळी क्रिकेटचं मैदान गाजवणार हा ढाण्या वाघ अखेर क्रिकेटमधून निवृत्त झालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: October 20, 2015, 4:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading