स्टंटबाजी करताना 11 वर्षाच्या चिमुकल्याचा गळफास लागून मृत्यू

स्टंटबाजी करताना 11 वर्षाच्या चिमुकल्याचा गळफास लागून मृत्यू

  • Share this:

soham more kanjur boy

20 ऑक्टोबर : कांजूरमध्ये दोन लहान मुल स्टंट करत असताना एका 11 वषच्य चिमुकल्याचा गळफास लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोहम मोरे असे मृत्यूमुखी पडलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. घरात कुणी नासताना धाकट्या भावासोबत खेळताना ही दुदैर्वी घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आई-वडील घरात नसताना धाकट्या भावासोबत सोहम ओढणीने रिअलिटी शोमधले खेळ खेळत होता. त्यावेळी अचानक अचानक छताच्या पाईपला ओढणीने गळफास लावून घेतला त्यात 11 वर्षांच्या सोहम मोरेचा जीव गेला. वडील कामानिमित्त बाहेरगावी गेले होते व घरगुती समारंभानिमित्त नातेवाईकांकडे जायचे असल्याने आई ब्युटीपार्लरमध्ये गेली होती. विशेष म्हणजे सोहमची आई दोन मुलांना घरात ठेवून दाराला बाहेरून कुलुप लाउन गेली होती.

आई बाहेर गेल्यानंतर दोघे भाऊ घरात नेहमीप्रमाणे आईच्या ओढणीने खेळ खेळत असताना अकरा वर्षाच्या चिकूने गळ्याला ओढणी बांधून दुसरे टोक छताच्या पाईपला बांधले आणि झोका घेतला. हा झोका चिकूच्या जीवावर बेतला. त्याला फाशी लागली आणि तो गतप्राण झाला. आई घरी आल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

दरम्यान, या धक्कादायक घटनेनंतर पालकांनी आपल्या मुलांवर आशा रिऍलिटी शो बाबत योग्य मार्गदर्शन करण्याचे आवाहन पोलिसांनी केलं आहे.

कशी घ्याल मुलांची काळजी ?

- आपली मुलं टीव्हीवर काय बघतात त्याकडे लक्ष द्या

- मुलांना शक्यतो स्टंटवाले रिऍलिटी शो पाहू देऊ नका

- घरात मुलं नेमकं काय खेळ खेळतात यावरही लक्ष द्या

- मुलांना शक्यतो घरात एकटं सोडू नका

- स्टंटमुळे जीवाला धोका होतो हे मुलांना व्यवस्थित समजावून सांगा

- मुलांशी कायम संवाद ठेवा, त्यांनी विचारलेले प्रश्न टाळू नका

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: October 20, 2015, 7:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading