सेहवागने दिले निवृत्तीचे संकेत

सेहवागने दिले निवृत्तीचे संकेत

  • Share this:

virendra sehwagh19 ऑक्टोबर : आपल्या तडाखेबाज फलंदाजीने बॉलर्सला सळो की पळो सोडणार, चौकर आणि षटकारने मैदान दणाणून सोडणारा भारताचा सेह'वाघ'आता क्रिकेटच्या मैदानातून माघारी परतणार आहे. वीरेंद्र सेहवागने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचे संकेत दिले आहे. दुबईमध्ये सेहवागने आपण निवृत्त होत असल्याचं संकेत दिले आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून दुखापती आणि फॉर्म हरवल्यामुळे सेहवाग भारतीय टीममध्ये स्थान मिळवू शकला नव्हता. दोनच दिवसांपूर्वी झहीर खानने निवृत्तची घोषणा केली आणि आता भारतीय टीमच्या 'वीरू'नेही क्रिकेटचा निरोप घेण्याची तयारी सुरू केलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: October 19, 2015, 10:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading