डॉक्टर तुम्ही सुद्धा !, जेजेच्या डॉक्टरांचा दारू पिऊन धिंगाणा

डॉक्टर तुम्ही सुद्धा !, जेजेच्या डॉक्टरांचा दारू पिऊन धिंगाणा

  • Share this:

j j hospital19 ऑक्टोबर : अलीकडेच मुंबईतील जेजे हॉस्पिटल आणि पुण्यातील डॉक्टरांना मारहाणीच्या घटना घडल्या होत्या. पुण्यात पोलिसांनीच डॉक्टरांना मारहाण केली होती. पण, आता डॉक्टर तुम्ही सुद्धा अशी म्हणण्याची वेळ आलीये. मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत आणि पकडल्यावर पोलिसांशी हुज्जत घालणार्‍या 3 डॉक्टरांना अटक करण्यात आलीये.

जे. जे. रुग्णालयातील तीन निवासी डॉक्टरांनी मद्यधुंद अवस्थेत पोलिसांवरच हल्ला चढविल्याची घटना ताडदेव भागात घडली. या घटनेनंतर पोलिसांनी या तिघांना अटक केली. जे. जे. रुग्णालयातील औषधे, अस्थिरोग आणि किरणोत्सर्ग या विभागांतील तीन डॉक्टरांनी ताडदेव विभागातील डॉ. शिव पंकज महेंद्र, डॉ. वेद आशीष रवीश आणि डॉ. राहुल जैन यांना ताब्यात घेतलंय. हे तिघंही प्रथम वर्षांचे निवासी डॉक्टर आहेत. रविवारी पहाटे ही घटना घडली होती. आपल्यावर मारहाण झाल्यास निवासी डॉक्टरांनी वेळोवेळी संप पुकारलाय. पण डॉक्टरच आपली मर्यादा ओलांडत असल्याचं समोर आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: October 19, 2015, 4:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading