‘बीसीसीआय’च्या कार्यालयात शिवसैनिकांचा राडा

‘बीसीसीआय’च्या कार्यालयात शिवसैनिकांचा राडा

  • Share this:

êÖêË×êÖêËêÖêy

19 ऑक्टोबर : पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष शहरियार खान यांच्या विरोधात आज (सोमवारी) सकाळी शिवसैनिकांनी मुंबईतील वानखेडे मैदानातील बीसीसीआय कार्यालयात घुसून शिवसैनिकांनी निदर्शनं करत 'पाकिस्तान मुर्दाबाद'च्या घोषणा दिल्या. यावेळी 50-60 शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये डिसेंबरमध्ये होणा-या मालिकेसंदर्भातील चर्चेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष शशांक मनोहर यांनी  शहरयार खान यांना आमंत्रण दिलं होतं. भारत-पाक क्रिकेट सामने सुरळीत होण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार खान आज बीसीसीआयच्या मुंबईत कार्यालयात चर्चेसाठी उपस्थित राहिलेही होते. मात्र याचवेळी 50-60 शिवसैनिक अचानक बीसीसीआयच्या कार्यालयात घुसून राडा घातला. यावेळी शिवसैनिकांनी पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 19, 2015 11:02 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading