ठाणेकरांचं पाणी महागलं! पाण्याच्या करात 20 ते 30 टक्के दरवाढ

ठाणेकरांचं पाणी महागलं! पाण्याच्या करात 20 ते 30 टक्के दरवाढ

  • Share this:

water-shortage MUMBAI

19 ऑक्टोबर : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका सरल्या की मगच शहरवासीयांच्या पाणीबिलात वाढ करण्याच्या शिवसेनेच्या मनसुब्यांवर ठाणे महानगरपालिका प्रशासनाने पाणी ओतलं असून, पाणी बिलात 20 ते 30 टक्के वाढ करण्याच्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे. पूर्वलक्ष्यी प्रभावाने एप्रिल 2015 पासून ही दरवाढ लागू होणार असल्याने नागरिकांच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे.

गेल्या फेब्रुवारीत झालेल्या नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आधी दरवाढीचा ठराव स्थगित ठेवला होता. निवडणुका संपताच त्यास जून महिन्याच्या मध्यावर मंजुरी देण्यात आली खरी, मात्र कल्याणमधील निवडणुका आटोपल्यावर ही दरवाढ प्रत्यक्ष लागू करावी, असा आग्रह सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी धरला होता. असं असताना प्रशासनाच्या दबावापुढे पदाधिकार्‍यांनी यासंबंधीचा अंतिम ठराव आयुक्तांच्या अंमलबजावणीसाठी पाठविल्याने एप्रिल महिन्यापासूनच ही दरवाढ अमलात आणली जाणार आहे.

यापूर्वी ठाणेकरांना ठोक पद्धतीने सहा महिन्याला किंवा वर्षांला ठरावीक दराने पाणी बिलांची आकारणी केली जायची. पण नव्या ठरावानुसार यापुढे घराच्या आकाराप्रमाणे पाण्याचे दर निश्चित करण्यात आले आहेत.

घराची आकारणी (चौरस फूट) : पाण्याचे दर

  • 250 ते 500 चौरस फूट : 210 रुपये
  • 500 ते 750 चौरस फुट : 230 रुपये
  • 750 ते 1000 चौरस फुट : 260 रुपये
  • त्यापेक्षा अधिक आकाराच्या घरांमध्ये राहणार्‍या रहिवाशांना 300 रुपयांपेक्षा अधिक बिलं

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: October 19, 2015, 7:48 AM IST

ताज्या बातम्या