विक्रोळीमध्ये सिलेंडरचा स्फोट, 8 जण गंभीर जखमी

विक्रोळीमध्ये सिलेंडरचा स्फोट, 8 जण गंभीर जखमी

  • Share this:

vikroli417 ऑक्टोबर : विक्रोळीत पार्कसाईट परिसरातल्या वर्षा नगरमध्ये एका चाळीतल्या घरात सिलेंडरचा स्फोट झाला. या सिलेंडर स्फोटात 8 जण गंभीर जखमी झाले. जखमींवर राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. या स्फोटातील एका जखमीला सायन हॉस्पिटलला हलवण्यात आलंय. स्फोटाचं कारण मात्र अजून कळू शकलं नाही.

काल शुक्रवारीही कुर्ल्यामधील एका हॉटेलमध्ये स्फोट झाला होता, आणि यात 8 जण ठार झाले. दरम्यान, या दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलंय. "कुर्ल्याच्या घटनेनं मला अतीव दुःख झालं. मुंबई मनपा आयुक्तांना मी त्वरित आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत. याला जबाबदार असणार्‍यांवर कडक कारवाई करण्यासही मी सांगितलं आहे."

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 17, 2015 02:51 PM IST

ताज्या बातम्या