लंडनमधील बाबासाहेबांच्या घराचं 12 नोव्हेंबरला लोकार्पण

  • Share this:

babasaheb_home17 ऑक्टोबर : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये वास्तव्यास असलेलं घर अखेर सरकारच्या ताब्यात आलंय. आता पुढील महिन्यात 12 नोव्हेंबरला या घराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

दोन आठवड्यांपूर्वी बाबासाहेबांचं घर खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली. तब्बल आठ महिन्यांच्या वाटाघाटीनंतर राज्य सरकारने हे घरं अखेर आता ताब्यात घेतलंय. एकूण 31 कोटी 29 लाख रुपयांना घराची खरेदी झाली आहे. भारतीय दूतावासाचे सरचिटणीस एन. पी . सिंग यांच्या सहीने करार झाला, आणि घरखरेदीचे सगळे व्यवहार पूर्ण झाले आहेत. आता या घराचं स्मारकात कसे रुपांतर करायचे यासाठी लवकरच समिती नेमली जाणार आहे. या घराचा लोकार्पण सोहळा 12 नोव्हेंबरला पार पडणार अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या लंडन स्कूल ऑफ इकोनोमिक्स मध्ये शिक्षण घेतले त्याच विद्यापीठात बाबासाहेबांच्या नावाने अध्यासनही सुरु करणार असल्याचही मुख्यमंत्री म्हणाले. जागतिक किर्तीच्या नागपूरच्या दीक्षाभुमीच्या विकासासाठी मास्टर प्लॅन तत्काळ मंजूर करू आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून निधी मिळवून देणार असल्याचही मुख्यमंत्री म्हणाले. नागपूरच्या दीक्षाभुमी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह संशोधन केंद्र आणि ग्रंथालयाच्या उद्धाटन कार्य्रकमात मुख्यमंत्री बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 17, 2015 02:22 PM IST

ताज्या बातम्या