S M L

वरिष्ठांच्या छळाला कंटाळून पोलीस निरीक्षकाची आत्महत्या

Sachin Salve | Updated On: Oct 17, 2015 02:03 PM IST

वरिष्ठांच्या छळाला कंटाळून पोलीस निरीक्षकाची आत्महत्या

17 ऑक्टोबर : जळगावमधल्या रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांनी काल (शुक्रवारी) रात्री 8 च्या सुमाराला नाशिकमध्ये राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सादरे यांची ओळख होती.

सादरे हे तेच जिगरबाज पोलीस अधिकारी...ज्यांनी जळगाव जिल्हा पोलीस दलातील बदल्यांमधील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला होता. त्यांना एका खोट्या गुन्ह्यात गोवल्याचे शल्य त्यांच्या मनात होते. वरिष्ठ अधिकारी त्यांना छळत होते; अशी तक्रार ते सातत्याने करीत असत. त्यांना निलंबितही केले गेले होते. भ्रष्ट पोलीस यंत्रणा आणि व्यवस्थेने एका चांगल्या अधिकार्‍याचा बळी घेतला.

पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांना गेल्या काही महिन्यापूर्वीच जळगांव येथील रामानंद पोलीस स्टेशनला कार्यरत असतांना वाळू माफियांच्या खोट्या तक्रारी मध्ये सादरे यांच्या विरुद्ध राजकीय दबावामुळे खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्या प्रकरणात सादरे यांना निलंबित केलेले होते आणि त्या गुन्ह्यामध्ये सादरे यांना उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला होता तेव्हा पासून सादरे वैफल्यग्रस्त झालेले होते. सादरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Loading...
Loading...
Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 17, 2015 02:03 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close