कुर्ला परिसरात हॉटेलमध्ये सिलेंडर स्फोट, 8 ठार

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 16, 2015 06:11 PM IST

कुर्ला परिसरात हॉटेलमध्ये सिलेंडर स्फोट, 8 ठार

kurla hotel blast16 ऑक्टोबर : मुंबईतील कुर्ला पश्चिम भागात सिटी किनारा या हॉटेलमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात आठजणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका महिलेचा सहभाग आहे. तर दोन जण जखमी झालेत. जखमींना राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुर्ला भागातील कमानी परिसरात किनारा हॉटेलमध्ये दुपारी 1च्या सुमारास सिलेंडर स्फोट झाला. या स्फोटामुळे पूर्ण हॉटेलमध्ये आग लागली. यात 8 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.

कमानी परिसरातील होली क्रॉस चर्चच्या समोर हे दोन मजली चायनिज हॉटेल आहे. दोन जण जखमी झालेत. जखमींना राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. सिलेंडरमधून गॅस गळतीमुळे हा स्फोट झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. घटनास्थळी अग्निशमन दल आणि वैद्यकीय पथक पोहचले आहे. अधिक तपासानंतरच स्फोटाचं कारण स्पष्ट होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 16, 2015 05:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...