News18 Lokmat

राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 16, 2015 09:45 PM IST

Image dushkal45645_300x255.jpg16 ऑक्टोबर : दुष्काळग्रस्त भागांतल्या लोकांना अखेर राज्य सरकारने दिलासा दिलाय. राज्यात मंत्रिमंडळाच्या उपसमितीतनं काही गावांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर केली आहे. 14 हजार 708 गावांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आलीये.

ज्या गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी होती त्या गावात दुष्काळ जाहीर करण्यात आलाय. या गावात कृषीपंपाच्या चालू बिलात 33.5 टक्के कपात घोषित करण्यात आली.

तसंच शाळा-कॉलेज विद्यार्थ्यांची फी माफ करण्यात आली आहे. कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भात केंद्राला त्वरीत प्रस्ताव पाठवणार असल्याचंही उपसमितीनं सांगितलंय.

दुष्काळग्रस्त भागाला काय मिळणार ?

- 14 हजार 708 गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती

Loading...

- या गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी

- कृषिपंपांच्या चालू वीज बिलामध्ये 33.5 टक्के सवलत

- दुष्काळसदृश भागातल्या शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ

- कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी खरेदी केंद्र तातडीने सुरू करणार

दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर होणं, ही मदत मिळण्यासाठी पहिली पायरी आहे. पण ही पूर्ण प्रक्रिया नेमकी कशी असणार ?

- राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ उपसमितीनं दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केलीये

- हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर येईल

- मंत्रिंमडळाची मंजुरी मिळाल्यानंतर प्रस्ताव केंद्राकडे जाईल

- त्यानंतर केंद्राचं पाहणी पथक राज्यात येईल

- पाहणी पथक केद्र सरकारकडे अहवाल सादर करेल

- अहलावावरून किती मदत द्यायची हे केंद्र सरकार ठरवेल

विभागवार परिस्थिती

 

कोकण विभाग- एकाही गावात दुष्काळ नाही

 नाशिक विभाग -

 दुष्काळसदृश गावं - 4, 869

नाशिक - 1577 धुळे - 614

नंदुरबार - 885

जळगाव - 1258

अहमदनगर - 535

 पुणे विभाग -दुष्काळसदृश गावं - 782

पुणे - 76

सातारा - 343

सांगली - 363

औरंगाबाद विभाग

 दुष्काळसदृश गावं - 8522

औरंगाबाद - 1353

जालना - 969

परभणी- 848

 हिंगोली - 707

नांदेड - 1562

बीड - 1403

लातूर - 943

उस्मानाबाद - 737

अमरावती विभाग - 57

अकोला - 55

 यवतमाळ - 2

नागपूर - विभाग 478

नागपूर -111

गडचिरोली 367

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 16, 2015 04:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...