कोकण रेल्वेचं लवकरच दुहेरीकरण आणि विद्युतीकरण होणार - सुरेश प्रभू

  • Share this:

Suresh prabhu 12

16 ऑक्टोबर : कोकण रेल्वे दुपदरीकरण आणि विद्युतीकरणाच्या कामाला 31 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी काल (गुरुवारी) केली. कोकण रेल्वेच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त वाशीमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रभू यांनी या मार्गाचे आधुनिकीकरण आणि विस्ताराच्या योजनांची माहिती दिली.

विद्युतीकरणामुळं दरवर्षी 100 कोटींची बचत होणार असल्याचंही ते म्हणाले. तसंच आगामी काळात 'कोरे'मध्ये साडेआठ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, 'एलआयसी'ने कमी व्याजदरात दीड लाख कोटी रुपये दिल्याचंही प्रभू यांनी नमूद केलं.

त्याचबरोबर भारतीय रेल्वे आणि कोकण रेल्वेमध्ये कोणताही भेदाभेद नाही. कोकण रेल्वे हे महामंडळ असले तरी, रेल्वेसाठी ते तितकेच महत्त्वाचे असल्याने येथील कर्मचार्‍यांनाही 78 दिवसांचा बोनस मिळेल, अशी घोषणा प्रभू यांनी केली.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 16, 2015 11:19 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...