अखेर पालिका नरमली, लोकशाहीर अमरशेख यांच्या कार्यक्रमाला मैदान मिळाले

अखेर पालिका नरमली, लोकशाहीर अमरशेख यांच्या कार्यक्रमाला मैदान मिळाले

  • Share this:

amar shekh15 ऑक्टोबर : लोकशाहीर अमरशेख यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमासाठी मैदान न देण्याचा अट्टहास करणार्‍या मुंबई महापालिकेनं अखेर माघार घेतली. शाहीरांच्या कार्यक्रमासाठी अखेर मैदान देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आयबीएन लोकमतने या बाबतीत केलेल्या पाठपुराव्यानंतर मुंबई महानगरपालिकेने हा निर्णय घेतलाय.

अमरशेख जन्मशताब्दी कार्यक्रम आता मुंबईत काळाचौकीच्या शहीद भगतसिंग मैदानावरच आता होणार आहे. यापूर्वी तांत्रिक कारण सांगून महापालिकेनं या कार्यक्रमासाठी परवानगी नाकारली होती. इतकंच नाही तर या कार्यक्रमाला परवानगी देण्यासाठी अमरशेख हे राष्ट्रपुरूषांच्या यादीत आहेत का ? असा प्रश्नही विचारला होता. पण आता पालिकेनं आपला निर्णय बदलला आहे. शहीद भगतसिंग मैदानावर आता 20 ऑक्टोबरला हा जन्मशताब्दीचा कार्यक्रम होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: October 15, 2015, 10:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading