दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टसाठी भारतीय टीमची घोषणा

28 जानेवारीदक्षिण आफ्रिकेविरुध्द होणार्‍या टेस्ट सीरिजसाठी गुरुवारी भारतीय टीमची निवड करण्यात आली. पहिल्या टेस्टसाठी 15 खेळाडूंच्या टीमची घोषणा करण्यात आली. राहुल द्रविड, युवराज सिंग आणि एस. श्रीसंत या दुखापतग्रस्त खेळाडूंना विश्रींती देण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी दोन नव्या चेहर्‍यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये कर्नाटकचा फास्ट बॉलर "अभिमन्यु मिथून" आणि पश्चिम बंागला टीमचा विकेट कीपर आणि बॅट्समन 'वृध्दीमन सहा' या नव्या खेळाडूचा समावेश आहे. अभिमन्यु मिथुनने आताच्या रणजी हंगामात 45 विकेट घेतल्या होत्या. तर दिनेश कार्तिकला डच्चू देण्यात आलं आहे. भारतीय निवड समितीच्या गुरुवारी मुंबईत झालेल्या बैठकीत टीम जाहीर करण्यात आली. दक्षिण आफ्रिकेची टीम भारताच्या दौर्‍यावर येत असून येत्या 6 फेब्रुवारीला भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान पहिली टेस्ट मॅच रंगणार आहे. भारतीय टीममध्ये सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, महेंद्रसिंग धोणी (कॅप्टन), व्ही.व्ही.एस.लक्ष्मण, हरभजन सिंग, ईशांत शर्मा, झहीर खान, प्रग्यान ओझा, अमित मिश्रा, सुदीप त्यागी, एस. बद्रीनाथ याची निवड करण्यात आली आहे.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 28, 2010 08:42 AM IST

ताज्या बातम्या