डान्सबार मालकांची राज्य सरकारकडे लॉबिंग -नवाब मलिक

  • Share this:

navab malik4415 ऑक्टोबर : डान्सबार मालक राज्य सरकारकडे लॉबिंग करत होते. या सरकारचीही डान्सबार सुरू करण्याची मानसिकता होती. यांनी सुप्रीम कोर्टात योग्य बाजू न मांडल्यामुळे बंदी उठली असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय.

सुप्रीम कोर्टाने डान्सबारवरची बंदी सशर्त उठवलीये. डान्सबार सुरू करा पण असभ्य प्रकार होता कामा नये असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी डान्स बार बंदीचा निर्णय घेतला होता. आज डान्स बार पुन्हा सुरू होण्याची शक्यता कोर्टाच्या निर्णयामुळे निर्माण झालीये. यावर राष्ट्रवादीने कडाडून टीका केलीये. डान्सबार मालक फडणवीस सरकारकडे लॉबिंग करत होते आणि डान्सबार सुरू करण्याची मानसिकता राज्य सरकारची होती असा आरोप नवाब मलिक यांनी केला. राज्य सरकारने कोर्टात योग्य बाजूच मांडली नाही. त्यामुळेही बंदी उठवण्यात आलीये. आज डान्सबारमुळे जरी बारबालांना रोजगार मिळेल. पण, अनेक कुटुंब यामुळे उद्धवस्त होणार आहे. आणि डान्सबार बंदी कुटुंब उद्धवस्त होऊ नये म्हणून घालण्यात आली होती असंही मलिक म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: October 15, 2015, 5:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading