शोभा डेंवर कारवाई करू नका, सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला निर्देश

शोभा डेंवर कारवाई करू नका, सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला निर्देश

  • Share this:

Shobha de14 ऑक्टोबर : प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिलाय. सुप्रीम कोर्टाने डे यांच्यावर कारवाई करू नका असे निर्देश महाराष्ट्र विधानसभेला दिले आहेत.

मराठी चित्रपट कुठे पाहायचा हे मला ठरवू द्या कुणाचाी दादागिरी कशाला असं ट्विट शोभा डे यांनी केलं होतं. तसंच मल्टिप्लेक्समध्ये पॉपकॉर्नऐवजी दही मिसळ आणि वडापाव खावा लागेल का, असा प्रश्नही त्यांनी विचारला होता. त्यांच्या वक्तव्याबद्दल विधानसभेनं त्यांना हक्कभंगाची नोटीस बजावली होती. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हे प्रकरण झालं होतं. पण यात हे लक्षात घेतलं पाहिजे की राज्यांच्या विधानसभा या सार्वभौम असतात. कोणत्याही कोर्टाचे निर्देश त्यांच्यावर बंधनकारक नसतात. सुप्रीम कोर्टाचेही निर्देश विधानसभा अमान्य करू शकते. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष काय भूमिका घेतात, हे पाहायचं. डे यांच्याविरोधात प्रताप सरनाई यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव आणला होता. विधानसभेनं डेंना आपली बाजू मांडण्यास सांगितलं होतं. पण त्यांनी तसं न करता सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: October 14, 2015, 3:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading