विरार : इंगळे बंधू मारहाण प्रकरणी गुंड गौरव राऊत अजूनही फरार

विरार : इंगळे बंधू मारहाण प्रकरणी गुंड गौरव राऊत अजूनही फरार

  • Share this:

13 ऑक्टोबर : मुंबईजवळील विरारमधल्या इंगळे बंधुंना मारहाण करणार्‍या टोळीचा मुख्य आरोपी गौरव राऊत 24 तासांनंतरही फरार आहे. काल सोमवारी ही घटना घडली होती. महापुरूषांबद्दल अपशब्द काढणार्‍यांना जाब विचारला म्हणून या तीन भावांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. गावगुंडांनी तीन भावडांना लाठी काठी, लोखंडी रॉडने अमानुष मारहाण केली. यात आयबीएन लोकमतचे विरारचे प्रतिनिधी प्रसन्नेजीत इंगळे यांचा समावेश आहे. विरारच्या संजीवनी रुग्णालयात या तिघांवर उपचार सुरू आहेत.

virar_ingle_attackकाल रात्री 10 च्या दरम्यान सागर इंगळे हा त्याचा मित्र सतीश बागवे याच्याकडे गेला होता. यावेळी तिथे जमलेल्या टोळक्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर या महापुरुषांबद्दल अपशब्द काढले. असं बोलू नका अशी विनंती सागरने केली. तेव्हा त्याला बेदम मारहाण करण्यात आली.

भांडण सोडवण्यासाठी आलेल्या सागरच्या दोन भावांनाही गाव गुंडांनी बेदम मारहाण केली. या तिघांना लाठी, काठी, लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली गेली आहे. यात तीस ते चाळीस जणांचा समावेश होता. दरम्यान पोलिसांनी वीस ते तीस जणांविरुद्ध ऍट्रोसिटी अंतर्गत गुन्हा केलाय. तर या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. पण, म्होरक्या गौरव राऊत अजूनही फरार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2015 04:32 PM IST

ताज्या बातम्या