अखेर पितृ पंधरवाड्याला छेद देत उमेदवारांचे अर्ज दाखल

अखेर पितृ पंधरवाड्याला छेद देत उमेदवारांचे अर्ज दाखल

  • Share this:

kdmc_3413 ऑक्टोबर : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकी करता उमेदवारी भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. पितृ पंधारवाडा आल्याने अतिशय कमी उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली होती. सर्व प्रथम नंदा भालेराव या महिलेने पितृ पंधरवाडा याला छेद देत राखीव प्रभागातून आपली उमेदवारी भरली. त्यानंतर बसपाच्या 2 उमेदवारांनी 27 गावातल्या प्रभागातून उमेदवारी अर्ज भरून बहिष्काराला छेद दिला.

काल सोमवारी संध्याकाळी भाजपचे खासदार कपील पाटील यानी शिवसेना जर 27 गावातल्या 21 प्रभागातून उमेदवारी भरत असेल तर भाजपसुद्धा आपले उमेदवारी अर्ज दाखल करेल. भाजपच्या या ऐनवेळी घेतलेल्या पावित्र्यामुळे 27 गावातील संघर्ष समितीचा बहिष्कार मोडीत निघालाय. ही समिती काल दिवसभर उमेदवार आणि काँग्रेस-राष्ट्रवादीशी तड़जोड़ करण्यात व्यस्त होती. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने मात्र 27 गावातील संघर्ष समितीसोबत जाण्याच्या त्यांचा निर्णय बदललेला नाही.

काल रात्री उशिरापर्यंत भाजप, मनसे आणि शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून पक्षाचे AB फॉर्म चे वाटप सुरू होते. मात्र पक्षांनी कितीही काळजी घेतली तरी सर्व पक्षांतून बंडखोरी अटळ आहे. सेना-भाजपमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची चिन्हे आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: October 13, 2015, 12:53 PM IST

ताज्या बातम्या