Elec-widget

कल्याण-डोंबिवलीतल्या रस्त्यावरील खड्‌ड्यांची राष्ट्रपतींकडून दखल

27 जानेवारी कल्याण-डोंबिवली येथे राहणार्‍या एका जागरूक नागरीकाने महानगरपालिकेच्या निष्क्रीय व्यवस्थेविरोधात आवाज उठवत थेट राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या कडे तक्रार केली आहे. गेल्या दहा वर्षांत पालिकेने आपल्या विभागातल्या रस्त्यांवरचे खड्डे बुजवलेच नाहीत, अशी तक्रार या नागरिकाने केली आहे. त्याने स्थानिक लोकप्रतिनिधींच्या कामाबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत. 25 जुलै 2009 रोजी ई-मेलद्वारे राष्ट्रपतींकडे ही तक्रार करण्यात आली होती. 6 महिन्यांनी राष्ट्रपतींनी त्याची दखल घेतली आणि पालिकेला एक पत्र पाठवलं. मात्र, राष्ट्रपतींकडे तक्रार करण्या पेक्षा नागरींकांनी आमच्याकडे यावं. आणि आमच्याकडून त्यांची निराशा तर त्यांनी आपली निर्णय घ्यावा. असं कल्याण-डोंबिवलीचे उपमहापौर नरेंद्र पवार यांना असं आवाहन केलं आहे. राष्ट्रपतींनी पत्र पाठवूनही कल्याण- डोंबिवली महानगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतीनीधिंनी खड्डे बुजवण्याबाबत अद्याप कोणतीही पावलं उचलली नाहीत.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 27, 2010 10:56 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...