कुलकर्णी पाकचे एजंट, आंदोलन मागे नाहीच -राऊत

  • Share this:

sanjay raut12 ऑक्टोबर : पाकिस्तानविरोधात शिवसेना गेल्या 25 वर्षांपासून मैदानात उतरलेली आहे. आजही पाकला आमचा कडाडून विरोध असून भारतद्वेषी खुर्शीद मेहमूद कसुरी यांच्या विरोधातलं आंदोलन मागे घेण्याचा प्रश्नच नाही असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. कसुरींच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं आयोजन करणारे सुधींद्र कुलकर्णी हे पाकिस्तानी एजंट आहे अशी घणाघाती टीकाही राऊत यांनी केली. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वत: पुढाकार घेऊन कार्यक्रमावर बंद आणावी अन्यथा शिवसेना आपल्या स्टाईलने आंदोलन करेन असा इशाराही संजय राऊत यांनी दिली.

पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद मेहमूद कसुरी यांच्या 'नायदर अ हॉक नोर अ डोव्ह' पुस्तक प्रकाशन सोहळा आज मुंबईत आयोजित केला खरा पण सेनेनं दोन दिवसाआधीच याला विरोध दर्शवत कार्यक्रम उधळवून लावू असा इशारा दिला होता. अखेर आज सकाळी शिवसैनिकांनी गणिमी कावा करत ओआरएफ संस्थेचे प्रमुख सुधींद्र कुलकर्णी यांना ऑईल पेंट फासलं. कुलकणीर्ंवर पेंट हल्ल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार समर्थन करत हे राष्ट्रभक्तीतून हे घडलं अशी ठाम बाजू मांडली. दुपारी त्यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा घेतला.

'सुधींद्र कुलकर्णी हे पाकिस्तानचे एजंट'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्यानंतर शिवसेनेनं आंदोलन मागे घेतलं अशी चर्चा सुरू झाली होती. पण, राऊत यांनी हा मुद्दा मोडीत काढून संध्याकाळपर्यंत वेट अँड वॉच असा इशाराच दिला. शिवसेना गेल्या 25 वर्षांपासून पाकविरोधात मैदानात उतरली आहे. त्यामुळे आजही आमचा पाकला विरोध कायम राहणार आहे. एकीक़डे सीमेवर आगळीक करायची आणि त्याच पाकच्या नेत्यांचा कार्यक्रम मुंबईत भरवायचा हे सहन करणार नाही. मसुरीसाठी कार्यक्रम भरवणारे सुधींद्र कुलकर्णी हे पाकिस्तानचे एजंट आहे अशी घणाघाती टीकाही राऊत यांनी केली.

'कसुरी भारतद्वेषी'

ज्या कसुरींसाठी कार्यक्रम भरवला जात आहे. त्यांनी परराष्ट्र असताना काश्मिरातील फुटीरतावादी आणि हुर्रियत नेत्यांच्या संघटनेनं प्रोत्साहन दिलं होतं. त्यांचा भाषा ही भारतद्वेषी आहे. याबद्दलचे पुरावे आमच्याकडे असून ते मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे पाठवले आहे. आता मुख्यमंत्र्यांनी कठोर भूमिका घेणं अपेक्षित असून या कार्यक्रमावर बंदी आणावी अशी मागणी केली. तसंच जोपर्यंत पाकचं वाकडं शेपूट सरळं होत नाही तोपर्यंत पाकसोबत संबंध ठेवू नये हीच शिवसेनाप्रमुखांची भूमिका होती आणि सेनेचीही भूमिका आहे असंही संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 12, 2015 04:37 PM IST

ताज्या बातम्या