शिवसेनेचा किल्ला लढवणारे संजय राऊत यांची होणार अँजिओप्लास्टी

शिवसेनेचा किल्ला लढवणारे संजय राऊत यांची होणार अँजिओप्लास्टी

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची अँजिओप्लास्टी होणार आहे. आज दुपारीच त्यांना छातीत दुखू लागल्याने लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

  • Share this:

मुंबई, 11 नोव्हेंबर : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची अँजिओप्लास्टी होणार आहे. आज दुपारीच त्यांना छातीत दुखू लागल्याने लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. विख्यात हृ्दयरोगतज्ज्ञ डॉ. सॅम्युअल मॅथ्यू हे त्यांच्यावर उपचार करतायत.त्याआधी संजय राऊत यांची अँजिओग्राफी करण्यात आली. त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉक निघाल्याने आता त्यांची अँजिओप्लास्टी होणार आहे.

विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर संजय राऊत सतत सत्तास्थापनेच्या चर्चेत व्यग्र होते. या सगळ्या धावपळीचा त्यांच्यावर ताण आला असावा. संजय राऊत यांना आधीपासून हृदयविकाराचा त्रास होत होता. आज जास्त त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

सत्तास्थापनेच्या चर्चेत संजय राऊत शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदावर ठाम होते. ते नेमकी काय भूमिका मांडतात याकडे प्रसारमाध्यमांचं लक्ष लागलं होतं. त्यातच सत्तास्थापनेसाठी दिलेल्या मुदतीचे अवघे काही तास राहिले असताना संजय राऊत यांना लीलावती रुग्णालयात दाखल करावं लागलं.

संजय राऊत यांच्यावर उपचार सुरू असतानाच आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई या शिवसेनेच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यांनी सत्तास्थापनेची इच्छा व्यक्त केली आणि वाढीव वेळ मागितला. पण शिवसेना पाठिंब्याची पत्र देऊ न शकल्याने राज्यपालांनी त्यांना वेळ वाढवून द्यायला नकार दिला.

=================================================================================

Published by: Arti Kulkarni
First published: November 11, 2019, 9:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading