शेती नाही पण शेतकर्‍यांचे अश्रू कळतात - उद्धव ठाकरे

शेती नाही पण शेतकर्‍यांचे अश्रू कळतात - उद्धव ठाकरे

  • Share this:

Uddhav2312

11 ऑक्टोबर : मला शेती कळत नसली तरी शेतकर्‍यांचे अश्रू कळतात असे सांगत शेतकर्‍यांच्या मुलींचे लग्न शिवसेनेकडून लावले जाईल अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे आज (रविवारी) दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी बीडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी बीड जिल्हय़ातील एक हजार शेतकर्‍यांना प्रत्येकी 10 हजार रूपयांची मदत दिली.

'अवकाळी पाऊस आणि सततच्या दुष्काळाने मराठवाडय़ातील शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे तो आत्महत्या करू लागला असल्याचं सांगत शेतकर्‍यांना वाचवायचं असेल तर त्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी यांनी या वेळी केली आहे.

मी शेतकर्‍यांना उपदेश देण्यासाठी नव्हे तर त्यांना मदत करण्यासाठी आलो आहे. आमची बांधिलकी सत्तेशी नसून शेतकर्‍यांशी आहे असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं. तसंच शेतकर्‍यांच्या मुलींच्या लग्नाचा खर्च शिवसेना करणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. सभा सुरू असताना पाऊस सुरू झाल्याकडे लक्ष्य वेधताना उद्धव ठाकरे म्हणाले, योगायोगाने आज बीडमध्ये पाऊस पडत आहे. भावना स्वच्छ असली की निसर्गही मदतीला धावून येतो, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपाला टोला लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: October 11, 2015, 8:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading