भाजपच्या सरकारला शिवसेनेचं टेकू - रामदास कदम

  • Share this:

ramdas kadamjpg

11 ऑक्टोबर :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नका, हे सरकार शिवसेनेच्या टेकूवर उभं आहे, हे लक्षात असू द्या, असा इशाराच पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी भाजपला दिला.

आज मुंबईत इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. पण या भूमिपूजन सोहळ्याचे शिवसेनेला शनिवार संध्याकाळपर्यंत निमंत्रणच मिळाले नव्हते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज बीड इथल्या शेतकर्‍यांच्या भेटीला जाणार असल्याचं जाहीर केलं. भाजपाने दिलेल्या वागणुकीमुळे शिवसेनेच्या गोटात नाराजी पसरली आहे. हा सगळा प्रकार म्हणजे श्रेय लाटण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केला आहे. तसंच, इंदू मिलमध्ये बाबासाहेबांचं भव्य-दिव्य स्मारक व्हावं ही शिवसेनेचीही इच्छा आहे. आमच्या शुभेच्छा या कार्यक्रमाला आहेत असंही रामदास कदम यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2015 08:04 PM IST

ताज्या बातम्या