Elec-widget

मुख्यमंत्री दिल्लीच्या तालावर नाचणारे - राज ठाकरे

मुख्यमंत्री दिल्लीच्या तालावर नाचणारे - राज ठाकरे

  • Share this:

raj on cm fadanvis09 ऑक्टोबर : ऐन निवडणुकीच्या तोंडावर कसले पॅकेज जाहीर करताय. मुळात राज्यात हिम्मत असलेला मुख्यमंत्री पाहिजे.पण, सध्याचे मुख्यमंत्री हे दिल्लीच्या तालावर नाचणारे आहे अशी घणाघाती टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. तसंच भाजप आणि शिवसेना हे टेंडर लाटण्यासाठी सत्तेवर आले आहे अशी टीकाही राज यांनी केली.

कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीसाठी पहिली सभा राज ठाकरे घेतली. यावेळी राज यांनी आज फक्त सुरूवात करतोय. यापुढील काही दिवस इथंच तळ ठोकून बसणार आहे. सगळ्या गोष्टींचा समाचार घ्यायचाय. पण आताच पत्ते उघडणार नाही असं सांगत राज यांनी प्रचाराला धडाक्यात सुरूवात केली. भाजप सरकार नुसती आश्वासनं देत आहे. त्यामुळे यांना 'थापा' सरकार असंच म्हणावं लागेल. कारण ही लोकं तोंडात येईल ते बोलताय. काँग्रेस आणि भाजपमध्ये फरक नाही असा टोलाही त्यांनी लगावला. भाजपला उमेदवार मिळत नाहीत. त्यामुळे ते दुसर्‍यांचे उमेदवार पळवताहेत असा आरोपही राज ठाकरेंनी केला. शिवसेना भाजप सत्तेवर आले. पण त्यांनी कल्याण डोंबिवलीची वाट लावून टाकलीये. सेना-भाजप फक्त टेंडरसाठी एकत्र आले आहे अशी टीका राज ठाकरेंनी केली.

मुख्यमंत्री दिल्लीच्या तालावर नाचणारे

ऐन निवडणुकी तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पॅकेज असे जाहीर करताय जणू साखरपुडा आहे. राज्य चालवण्यासाठी हिम्मत असलेला माणूस पाहिजे. पण, आपले मुख्यमंत्री हे नरेंद्र मोदींच्या सांगण्यावर उठबस करताय. दिल्लीच्या तालावर मुख्यमंत्री नाचताय अशी तोफही त्यांनी डागली. मोदी सरकार सत्तेवर येण्याआधी 100 दिवसांत अच्छे दिन येतील असं म्हणाले होते पण कुठे आहे अच्छे दिन ?, हे दाखवून द्यावं अशी टीकाही पंतप्रधान मोदींवर केली.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 9, 2015 09:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...