कुंभमेळा संपला, गोदावरी पुन्हा 'मैली' !

कुंभमेळा संपला, गोदावरी पुन्हा 'मैली' !

  • Share this:

godavari)nashik09 ऑक्टोबर : गेल्या महिन्याच्या पंचवीस तारखेलाच नाशिक सिंहस्थ कुंभ मेळ्याच्या शेवटच्या पर्वणीची सांगता झाली. तब्बल 2400 कोटी रुपयाच्या गंगाजळीतून बारा वर्षानं येणारा हा कुंभमेळा निर्विघ्न साकारला. पण ज्या गोदावरी नदीच्या जीवावर शासकीय यंत्रणांनी या महाकाय निधीची लयलूट केली त्या नदीला कुंभमेळा संपताच पुन्हा गटारगंगेचं स्वरूप आलंय. नाशिक महानगर पालिका प्रशासनानं गोदा पात्रात मिसळणार्‍या प्रदूषित पाण्याची कुंभमेळ्यातील स्नाना दरम्यान विल्हेवाट जरी लावली असली तरी पर्वणी संपताच पुन्हा एकदा गोदावरी प्रदूषित झाल्याचं समोर येतंय..

देश भरात न्यायालयाने नदी प्रदुषणा संदर्भात उपाय योजना सुचवून, कडक अम्मल बजावणीचे आदेश पारित केले होते. नाशिक च्या गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा विषय गेल्या दोन वर्षांपासून गाजतोय, या साठी पर्यावरण वाद्यांनी थेट न्यायालयात धाव घेतल्यानं कोर्टाने प्रदूषण मुक्ती शिवाय कुंभ मेळ्याच्या आयोजना वरच आक्षेप घेतला होता. नाशिक महानगरपालिकेनं या साठी काही प्रमाणात प्रयत्न करत, नाले वळवण्याचे काम हाती घेतले होते. पण, कुंभ पर्वणी संपून 13 दिवस होत नाही तोच गोदावरीत मलजल आणि नाल्यांचे पाणी मिसळण्यास सुरुवात झाल्यानं न्यायालयाच्या आदेशालाच महापालिका प्रशासनाने केराची टोपली दाखवली. गोदावरी नदीचे वाढते प्रदूषण हा पुन्हा एकदा चिंतेचा विषय झाल्यानं पर्यावरणवादी पुन्हा एकदा न्यायालयाकडे दाद मागणार आहेत.

नाशिक महापालिकेच्या अधिकार्‍यांकडे या विषयी विचारणा केली असता कोर्टाच्या आदेशा नुसार गोदावरी प्रदूषण रोखण्यासाठी

शहरातील 19 नाल्यानं पैकी 10 नाले कायमस्वरूपी बंद तर उर्वरित नाले वळवण्यात आल्याचे सांगत आत्ता गोदापात्रात मिसळणारे पाणी हे पावसाळी नाल्यान मधून वाहणारे पाणी असल्याचे सांगत विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला गेला.

धार्मिक मान्यतेनुसार कुंभ-पर्व हे वर्षभर राहणार असून पाप क्षालनासाठी आणि मोक्ष प्राप्तीसाठी आजही रामकुंडावर गर्दी दिसतेय,पण महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे ज्या नदीने लक्षावधी भाविकांना पवित्र स्नान घातलं ती नदीच या पुढे स्वच्छ, निर्मळ राहील का हाच खरा प्रश्न निर्माण झालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: October 9, 2015, 7:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading