ट्युनिशियाच्या 'नॅशनल डायलॉग क्वार्टेट' संस्थेला शांततेचा नोबेल पुरस्कार

ट्युनिशियाच्या 'नॅशनल डायलॉग क्वार्टेट' संस्थेला शांततेचा नोबेल पुरस्कार

  • Share this:

nobel_201509 ऑक्टोबर : यावर्षीचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार ट्युनिशियामधल्या संस्थेला जाहीर झाला. ट्युनिशियाच्या 'नॅशनल डायलॉग क्वार्टेट'या संस्थेला हा पुरस्कार दिला जाणार आहे.

ट्युनिशियन जनरल लेबर युनियन, द ट्युनिशिअन कॉन्फीडरेशन ऑफ इंडस्ट्री, ट्युनिशियन ह्युमन राईट्स लीग आणि द ट्युनिशियन ऑर्डर ऑफ लॉयर्स या चार संस्थांची मिळून एक संस्था बनली आहेत. 2010 -11 या काळात ट्युनिशियामध्ये जो संघर्ष झाला त्यामध्ये शांतता प्रस्थापित केल्याबद्दल या संस्थांचा गौरव होणार आहे.

2011 च्या उठावानंतर ट्युनिशियामध्ये सर्वसमावेशक लोकशाहीची स्थापना करण्यात या संस्थांचं मोठं योगदान आहे. या पुरस्कारासाठी 273 जणांची नावं चर्चेत होती. पोप फ्रान्सिस आणि जर्मनीच्या अँजेला मर्कल यांचं नाव यामध्ये आघाडीवर होतं. पण अखेर या पुरस्कारासाठी ट्युनिशियाच्या संस्थेची निवड झाली.

2010 आणि 2011 या काळात ट्युनिशियामध्ये उठाव झाला. त्यानंतर लिबिया, इजिप्त या देशांबरोबरच अरब देशांमध्ये ही चळवळ पसरत गेली. पण या अस्थिरतेनंतर ट्युनिशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचं श्रेय नॅशनल डायलॉग क्वार्टेट या संस्थेकडे जातं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: October 9, 2015, 5:28 PM IST

ताज्या बातम्या