'जोगवा'ला पाच राष्ट्रीय पुरस्कार

'जोगवा'ला पाच राष्ट्रीय पुरस्कार

23 जानेवारी 'जोगवा' या मराठी सिनेमाला पाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. 56व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा शनिवारी दिल्लीत झाली. यावेळी सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी उपेंद्र लिमये, सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक म्हणून अजय-अतुल आणि उत्कृष्ट सामाजिक चित्रपटाचा पुरस्कारही जोगवाने पटकावला आहे. याच चित्रपटासाठी उत्कृष्ट पार्श्वगायनाचा पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायक हरिहरन आणि श्रेया घोषाल यांना मिळाला आहे. जोगता-जोगतिणींची व्यथा-वेदना मांडणार्‍या या चित्रपटात उपेंद्र लिमयेने जोगत्याची भूमिका साकारली आहे. सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून 'अंतहिन' या बंगाली सिनेमाची निवड करण्यात आली आहे. नातेसंबंधावर आधारीत असणार्‍या अंतहीन या सिनेमात शर्मिला टागोर, राहुल बोस, अपर्णा सेन आणि राधिका आपटे यांनी भूमिका केल्या आहेत. नान कदाऊल या तमिळ सिनेमासाठी बाला यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार घोषित झाला आहे. सर्वोत्कृष्ट दिगर्दशक : 'ए वेनस्डे'चे दिग्दर्शक निरज पांडे सर्वोत्कृष्ट लोकप्रिय सिनेमा म्हणून दिबांकर बॅनर्जी यांच्या ओय लकी लकी ओय या सिनेमाने मान पटकावला आहे. 'फॅशन' साठी प्रियांका चोप्रा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, 'रॉक ऑन'साठी अर्जुन रामपालला सर्वोत्कृष्ट सहअभिनेता, 'फॅशन' साठीच कंगना राणावतला सर्वोत्कृष्ट सहाअभिनेत्री असे पुरस्कार घोषित केले आहेत. सर्वोत्कृष्ट बालचित्रपट गबाचिगलू (कन्नड), सर्वाेत्कृष्ट ऍनिमेशनपट- रोडसाड रोमिओ, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : हरीहरन सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका : श्रेया घोषाल.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 23, 2010 12:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading