नागपुरात 9 महिन्यांच्या नातीसमोरच आजीची झाली हत्या!

नागपुरात 9 महिन्यांच्या नातीसमोरच आजीची झाली हत्या!

  • Share this:

crime

07 ऑक्टोबर : नागपुरात दिवसाढवळ्या 65 वर्षीय वृद्ध महिलेचा गळा आवळून झालेल्या हत्येमुळे नागपूर शहर हादरून गेलं आहे. शहरातील उच्च-भ्रू वस्तीत असलेल्या तात्या टोपे नगरमध्ये राहणार्‍या वंसुधरा बाळ उर्फ जयश्री आनंद बाळ यांची आज (बुधवारी) सकाळी पावणेनऊ ते साडेदहाच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून हत्या केली.

वसुंधरा बाळ या नागपुरातील प्रसिद्ध डॉक्टर आनंद बाळ यांच्या पत्नी होत्या. जयश्री आणि त्यांची एक वर्षांची नात या दोघीच घरात असताना त्यांची होत्या करण्यात आली आहे. सव्वा नऊच्या सुमारास त्यांची मोलकरीन घरी आली. दरवाजा वाजवूनही आतून कोणताही दरवाजा उघडत नसल्याने तीने खिडकीतून डोकावून पाहिलं. त्यावेळी त्यांना जयश्री खाली पडलेल्या आणि त्यांच्या शेजारी त्यांची नऊ महिन्यांची नात रडत होती.

शेजार्‍यांच्या मदतीने पोलिसांना बोलावण्यात आलं. वसुंधरा यांच्या डोक्यावर आणि गळयावर गंभीर जखमा आढळून आल्या. दरम्यान, चोरीच्या उद्देशाने जयश्री यांची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, घरातल्या एकाही वस्तूची चोरी झालेली नसल्याने वसुंधरा बाळ यांची हत्या ओळखीतल्याच व्यक्तीने केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र हत्येमागचं नेमकंकारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. त्याच बरोबर, हल्लेखोराने वसुंधरा बाळ यांची हत्या त्यांच्या 9 महिन्यांच्या नातीसमोर केली असावी, असा अंदाजही पोलिसांनी व्यक्त केला आहे. सुदैवाने चिमुकलीला मात्र कोणत्याच प्रकारची इजा झाली नाही.

या घटनेनंतर नागपुरात आता घरातही नागरिक सुरक्षित नसल्याची भावना व्यक्त होत आहे. गृहखात असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदासंघात या वृद्ध महिलेची दिवसाढवळ्या हत्या झाल्याने नागपुरात कायदा-सुव्यवस्था पुर्णपणे ढासळली असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: October 7, 2015, 7:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading