Elec-widget

अखेर मच्छीमारांनी समुद्रातलं उपोषण सोडलं

अखेर मच्छीमारांनी समुद्रातलं उपोषण सोडलं

  • Share this:

sindhudurga34563407 ऑक्टोबर : सिंधुदुर्गात पारंपरिक आणि पर्ससीन मच्छीमारांमधला संघर्ष दिवसेंदिवस वाढत चाललाय. याविरोधात अन्वय प्रभू या मच्छीमाराने चक्क दोन दिवस समुद्रात उपोषण केलंय. मत्स्यविकास मंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर उपोषण सोडण्यात आलं.

सिंधुदुर्गात पर्ससीन मच्छिमारांविरोधात स्थानिक मच्छीमारांनी एल्गार पुकारलाय. गेल्या अनेक दिवसांपासून मच्छीमारांनी वारंवार आंदोलनं केली. किनारपट्टीलगत विनापरवाना मासेमारी करणारे ट्रॉलर्स हे बेसुमारपणे किनारपट्टीवर वावरताना दिसत आहेत. याविरोधात आणि ही बेसुमार विनापरवाना होणारी मासेमारी रोखण्यासाठी मालवणच्या अन्वय प्रभू या मच्छीमाराने चक्क दोन दिवस समुद्रात उपोषण केलंय. मत्स्यविकास मंत्र्यांना अन्वय प्रभू यांच्या उपोषणाची तातडीने दखल घ्यावी लागलीये. आणि तातडीने उपाययोजना करण्याच्या आश्वासनावर हे उपोषण स्थगित करण्यात आलंय. मात्र, या निमित्ताने पुन्हा एकदा मासेमारी... हंगाम भरात असतानाच पारंपरिक आणि पर्ससीन मच्छीमारात संघर्ष भडकण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 7, 2015 09:00 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com