S M L

फेसबुक, गुगलला युरोपियन युनियनच्या कोर्टाचा दणका

Samruddha Bhambure | Updated On: Oct 6, 2015 08:01 PM IST

फेसबुक, गुगलला युरोपियन युनियनच्या कोर्टाचा दणका

sadfas;fkhasy

06 ऑक्टोबर : फेसबुक, गुगल आणि ऍमेझॉनसहीत अनेक बड्या कंपन्यांना युरोपियन युनियनच्या कोर्टाने दणका दिला आहे. या सर्व कंपन्यांची चौकशी करुन त्यांना डाटा ट्रान्सफर करण्यापासून कसं रोखता येईल हे ठरवलं पाहिजे असं कोर्टाने म्हटलं आहे.

फेसबुक, गुगलसारख्या कंपन्या युरोपमधील लोकांची व्यक्तीगत माहिती अमेरिकेतील सर्व्हरकडे पाठवत असल्याचा दावा करत ऑस्ट्रियातील लॉचा विद्यार्थी मॅक्स श्रेम्स याने युरोपियन युनियनच्या कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर कोर्टाने निकाल दिला आहे. युरोप आणि अमेरिकेत झालेला सेफ हार्बर करारच कोर्टाने अयोग्य असल्याचं मत मांडलं. त्याचबरोबर, आता अमेरिकेच्या सर्व्हरमध्ये माहिती ट्रान्सफर करायची की नाही याचा निर्णय आयर्लंडमधील प्रशासनाने घ्यावा असेही कोर्टाने स्पष्ट केलं आहे.कोर्टाच्या या निर्णयाचा फटका फेसबुक, गुगल, ऍमेझॉन अशा तब्बल 4 हजार कंपन्यांना बसणार आहे. अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणा अमेरिकेतील सर्व्हरमधील व्यक्तिगत माहितीवर नजर ठेवत असल्याचा गौप्यस्फोट एडवर्ड स्नोडेनने केला होता. मॅक्सने याच दाव्याचा वापर पुरावा म्हणून केला होता. अमेरिका आणि युरोपिय महासंघात 15 वर्षांपूर्वी सेफ हार्बर करार झाला होता. यानुसार अमेरिकेतील कंपन्या युरोपमधील माहिती त्यांच्या सर्व्हरवर ट्रान्सफर करू शकत होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Loading...
Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 6, 2015 08:01 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close