राधे माँला पोलिसांचा दिलासा, जादुटोणा कायद्याचे उल्लंघन नाही !

राधे माँला पोलिसांचा दिलासा, जादुटोणा कायद्याचे उल्लंघन नाही !

  • Share this:

radhe maa pc06 ऑक्टोबर : आध्यात्मिक गुरू राधे माँ आपल्या भक्तांच्या आरोपांमुळे वादात सापडलीये. मात्र, मुंबई पोलिसांनी राधे माँला दिलासा दिलाय. तिच्याकडून जादुटोणा कायद्याचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन झालं नसल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

राधेमाँच्या घरी केलेल्या झडतीत या संबंधी कोणतेही पुरावे समोर आलं नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसंच या प्रकरणात आपल्याला नाहक अडकवण्यात येतंय असा आरोप राधे माँने केला. ऍड फालगुनी ब्रम्हभट यांनी राधे माँ विरोधात याचिका दाखल केली होती. सोमवारी या प्रकरणी सुनावणी झाली. शिवाय राधे माँच्या ट्रस्टमधील पौशांच्या व्यवहारांसंबंधी तपास करण्याचे पत्र धर्मदाय आयुक्तांना आणि प्राप्ताकविभागाला या संबंधी विनंती करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: October 6, 2015, 8:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading