लाज गेली आणि मालिकाही गेली

लाज गेली आणि मालिकाही गेली

  • Share this:

ind vs sat06 सप्टेंबर : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 सामन्यामध्ये टीम इंडियाने सपेशल लोटांगण घेतलंय. धोणी बिग्रेडच्या या लोटांगणामुळे भारताची लाजही गेली आणि हातून मालिकाही गेली. टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं सहा गडी राखून भारतावर दणदणीत विजय मिळवला. या सामन्यासह दक्षिण आफ्रिकेनं टी 20 मालिका जिंकली.

दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकून भारताला पहिली बॅटिंग करण्याचं निमंत्रण दिलं. दक्षिण आफ्रिकेच्या भेदक मार्‍यापुढे टीम इंडियाची दाणादाण उडाली. रोहित शर्मा आणि शिखर धवन जोडी 28 धावांची सलामी देऊन माघारी परतली. त्यानंतर कुणालाही मोठा स्कोअर उभारता आला नाही. एकापाठोपाठ गडी बाद होत गेली. अवघ्या 92 धावांवर टीम इंडिया गारद झाली. हा स्कोअर टी 20 मध्ये भारताचा दुसरा सर्वात कमी स्कोअर आहे. दक्षिण आफ्रिकेनं 93 धावांचं टार्गेट अठराव्या ओव्हरमध्ये पूर्ण करत मालिका खिश्यात घातली.

चाहते संतापले

पण, या समान्यादरम्यान भारताला शरमेनं आपली मान खाली घालावी लागली. भारतीय टीमनं फक्त 92 रन्स केल्यामुलए कटकचे चाहते संतापले आणि त्यांनी ग्राऊंडवर पाण्याच्या बाटल्या फेकायला सुरुवात केली. दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग सुरू असताना हा प्रकार घडला. थोडा वेळ खेळ थांबवावा लागला. पण, चाहत्यांनी पुन्हा बाटल्या फेकण्यास सुरूवात केली. मॅच रेफ्री क्रिस ब्रॉड शेवटी मैदानात आले, आणि त्यांनी सुरक्षा अधिकार्‍यांशी चर्चा केली. त्यानंतर बाकीचा खेळ नीट पार पडला. इतर सर्व स्टेडिअममध्ये बाटल्या नेण्यास मनाई आहे. पण हा नियम कटकमध्ये लागू का नाही, हाच खरा प्रश्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: October 6, 2015, 8:30 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading