नागपूरच्या फुटाळा परिसरात तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

  • Share this:

crime

04 ऑक्टोबर : नागपूरच्या फुटाळा चौपाटी परिसरात काल (शनिवारी) रात्री दहाच्या सुमारास एका 22 वर्षय तरुणी संशयास्पदरीत्या जळाल्याने एकच खळबळ उडाली. टेक्सटाईल इंजिनिअरिंगची विद्यार्थीनी असणार्‍या या मुलीला पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न झाला. ती 80 टक्के भाजली असून हा आत्महत्येचा प्रयत्न आहे की हत्येचा, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. या तरुणीची प्रकृती चिंताजनक असून, तिला ऑरेंज सिटी हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यात आलं आहे.

फुटाळा चौपाटीच्या एका हॉटेलच्या गच्चीवर ही तरुणी जळली. तरुणी जळत असताना तिच्या किंकाळ्या काहींच्या कानावर आल्या. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या तिची प्रकृती गंभीर आहे. संबंधित तरुणीने स्वतःला जाळून घेतलं की तिला जाळण्याचा प्रयत्न झाला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ज्या हॉटेलच्या गच्चीवर ही घटना घडली, ते 'फर्स्ट लव्ह' नावाचं हॉटेल गेल्या दोन-तीन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे फुटाळा चौपाटी आणि आजूबाजुच्या परिसरात प्रेमीयुगुलांबरोबरच समाजकंटकांचीही मोठी गर्दी असते. या तरुणीला जाळणारे आरोपी हे हॉटेलच्या मागील भागातील झाडाझुडपातून पळून गेले. साक्षीदारांच्या जबानीवरून या प्रकरणात पोलीस आणखी तपास करत आहेत.

दरम्यान, या घटनेच्या दोन तासानंतर याच घटनास्थळासमोरील फुटाळा तलावात क्रांती गजभिये नावाच्या एका तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केल्याने या प्रकरणाचा या जळीत प्रकरणाशी काही संबध आहे का याचाही तपास पोलीस करत आहेत.

गुन्ह्यांची राजधानी नागपूर

  • 10 सप्टेंबर 2015 - भरतवाडा परिसरात धंद्यातल्या स्पर्धेतून दोन भावंडांचा खून
  • 15 सप्टेंबर 2015  - सिराज शेख या व्यावसायिकाच्या फार्म हाऊसवरील रेव्ह पार्टीत पूर्वा हेडाऊ या मुलीचा स्विमिंग टँक मध्ये बुडून मृत्यू
  • 16 सप्टेंबर 2015 - मिहान प्रकल्पाच्या कंपाऊंडजवळ मुलीची हत्या, प्रेमप्रकरणातून स्कूल बसचालकाने बलात्कार करून केला खून
  • 20 सप्टेंबर 2015 - नंदनवन इथे रंजना बानेवार या महिलेनं आपलेच पती रमेश बानेवारचा खून करून मृतदेह घरातच पुरला
  • 30 सप्टेंबर 2015 - सेव्हन हिल बार हत्या प्रकरणातील आरोपी तुषार दलाल पॅरोलवर बाहेर येऊन फरार. पत्रकाराला मारण्याचा केला प्रयत्न
  • 1 ऑक्टोबर 2015 - सुमित ठाकूरचे वकील अवधेश केसरी यांची गाडी अज्ञातांनी जाळली
  • 1 ऑक्टोबर 2015 - कुख्यात गुंड सुमित ठाकुर याच्याकडून प्राध्यापक मस्केच्या गाडीची जाळपोळ. सुमित ठाकूर अद्याप फरार.
  • 3 ऑक्टोबर 2015 - बाल्या वंजारी या गुंडाच्या दहशतीला कंटाळून सुरेश बघेले या व्यक्तीची आत्महत्या

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 4, 2015 11:36 AM IST

ताज्या बातम्या